Sharad Pawar Resigns Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: '...अन्यथा खाली उतरणार नाही', चिंचेच्या झाडावर चढून वृद्धाचा पवारांसाठी सत्याग्रह

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याचा चिंचेच्या झाडावर सत्याग्रह

नीलकंठ कांबळे

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी कुणी उपोषण करत आहे, तर कुणी रक्ताने पत्र लिहलं आहे. तर पक्षातील नेते, कार्यकर्ते शरद पवार यांची समजूत घालत आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या सर्व कार्यकर्त्यांची मनधरणी करत आहेत. मात्र एका कार्यकर्त्याने तर हद्द पार केली आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय शरद पवार यांनी मागे घ्यावा, यासाठी लोहारा तालुक्यातील आरणी येथील सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याने चक्क चिंचेच्या झाडावर बसून सत्याग्रह करत पवार यांना साकडे घातले आहे. 

लोहारा तालुक्यातील आरणी येथील बळवंत थिटे हे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी आहेत. सेवानिवृतीनंतर आता शेती करीत आहेत. श्री. थिटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत, यासाठी सन १९९३ ते २०१४ या काळात आपली दाढी वाढवून पवार यांचे पंतप्रधान पदासाठी समर्थन केले होते. विशेष करून श्री. थिटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते नाहीत.

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेली निर्णय त्यांना रूचला नाही. पवार यांनी आपली निवृत्ती मागे घ्यावी, यासाठी श्री थिटे यांनी गुरुवारी (ता. चार) दुपारी बारा वाजता आपल्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह सुरू केले आहे. ग्रामस्थांनी बळवंत थिटे यांना झाडावरून खाली उतरण्याची विनवणी केली. परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहात सत्याग्रह सुरूच ठेवला आहे.

शरद पवार यांनी इतरांना विश्वासात न घेता तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. ही बाब आमच्यासारख्या समर्थकांना वेदनादायी आहे. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, यासाठी झाडावर बसून सत्याग्रह करीत आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसच्या बैठकीत कोणता निर्णय होतोय ते पाहून झाडावरुन खाली उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचं बळवंत थिटे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT