nitesh rane judicial custody esakal
महाराष्ट्र बातम्या

अटकेतील नितेश राणेंची बिघडली तब्येत; आता रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली होती. आज त्यांची कोठडी संपली असून त्यांना आता न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आलं आहे. आज त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी नितेश यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केल्यामुळे न्यायालयानं १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. दुसरीकडे त्यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत तब्येत बरी नसल्याचे समोर आल्याने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, पोलिस कोठडी संपली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीत असणार आहे.

काय आहे हे प्रकरण?

सिंधुदुर्गातील शिवसेना नेते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केली होती. त्यानंतर संशयाची सुई भाजप आमदार नितेश राणेंभोवती फिरत होती. त्यानुसार, त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु झाले होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. पण, नितेश राणे कुठे होते? हे कोणाला माहिती नव्हते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना न्यायालयाला शरण येण्यास सांगितले. त्यानंतर आता त्यांना अटक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT