Nitin Gadkari esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari: पंधरा वर्षे जुनी वाहनं होणार स्क्रॅप; प्रत्येक जिल्ह्यात होतेय रोजगार निर्मिती

संतोष कानडे

मुंबईः केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. पंधरा वर्षे जुनी असलेली सर्व सरकारी वाहनं स्क्रॅप होणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती होईल, असं त्यांनी सांगितलं.

पर्यावरणपूरक आणि धाडसी निर्णयामुळे नितीन गडकरी यांची वेगळीच ओळख आहे. आता गडकरी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गडकरी म्हणाले की, भारत सरकारकडे जेवढी जुनी, पंधरा वर्षे पूर्ण झालेली वाहनं आहेत. ती आता लवकरच स्क्रॅप होतील. फक्त केंद्र सरकारचीच नाही प्रत्येक राज्याला याबाबत सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारी संस्था आणि उपक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या मग त्या ट्रक, बस किंवा कार स्क्रॅप केल्या जातील. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमतीने काम करा, अशी दाद दिल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.

प्रत्येक जिल्ह्यात रोजगारनिर्मित होणार

सरकारी गाड्या स्क्रॅप करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिट उभा करणार असल्याचं गडकरी म्हणाले. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या निर्णयामुळे वाढलेल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. सध्या तरी केवळ सरकारी वाहनांच्या बाबतीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT