Rahul Narwekar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narwekar: 'राहुल नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा नाहीच' ठाकरे गटाने न्यायाची अपेक्षा सोडली?

रुपेश नामदास

Rahul Narwekar: देशभरात अपवाद वगळता सत्तेला पारखे झालेल्या काँग्रेस पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या विजयाने आज नवसंजीवनी मिळाली. येथील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला चारीमुंड्या चित करत काँग्रेसने १३६ जागांवर विजय मिळवित बहुमतासाठी आवश्‍यक असलेला ११३ जागांचा आकडाही सहज पार केला.

आता कर्नाटकमध्ये स्वबळावर काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहे. यावर देशासह विविध राजकीय पक्षांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. या निकालवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले की, भाजपचे देशभरातील आर्मी कर्नाटकमध्ये येवून देखील भाजपचा इथे पराभव झाला १९७८ साली इंदिरा गांधी यांच्यासोबत झालं होतं त्याची सुरूवात पुन्हा एकदा कर्नाटक पासून चालू झाली आहे, त्यामुळे कर्नाटक तो झाँकी महाराष्ट्र अभी बाकी" तर पुढं म्हणाले आम्ही २०२४ ची तयारी करत आहोत महाराष्ट्र हे भाजपने लुटलेलं राज्य आहे. त्यामुळे हे राज्य जास्त दिवस त्यांच्याकडे टिकणारं नाही" अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर बोलताना म्हणाले की, "विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन मधून मुलाखत देतात, शिवसेनेचे १६ आमदार कसे अपात्र होतील याविषयी तिकडे प्रवचना करतात. त्यांच्यावर टीका करताना म्हणाले नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास मोठा आहे, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही.

आम्ही फक्त सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आव्हान करत आहोत. नाही तर महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला दाखवावं लागेल, ही धमकी नाही, तुम्ही कायद्याचे पालन करा, पक्षांतराला उत्तेजन देवून तुम्ही लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहात ती आम्ही होवून देणार नाही, आपण जर खरंच वकील असाल तर कायद्या चौकटीत राहून निकाला द्या" अशा तिखट भाषेत राऊतांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT