Mumbai High Court Sakal media
महाराष्ट्र बातम्या

मैत्रीणीसोबत संबंध ठेवून ऐनवेळी लग्नास नकार देणारे बलात्कारी नाहीत- हायकोर्ट

मैत्रिणी बरोबर दिर्घकाळ संबंध ठेऊन ऐनवेळी लग्नाचा विचार बदलणार्या आरोपीवर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मैत्रिणी बरोबर दिर्घकाळ संबंध ठेऊन ऐनवेळी लग्नाचा विचार बदलणार्या आरोपीवर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून आणि किगदपुराव्यांवरून आरोपीला खरोखरच महिलेबरोबर विवाह करायचा होता, असे स्पष्ट होत आहे. मात्र नंतर त्याने विचार बदलला आणि लग्नाला नकार दिला. यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मत औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केले आहे.

तीस वर्षी महिलेने आरोपीविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने लग्नाचे वचन दिले आणि त्यातून आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. तिचे नातेवाईक त्याच्या घरी बोलणी करायला गेली होती. मात्र तेव्हादेखील त्यांनी लग्नाला तयारी दर्शविली आणि कोविड परिस्थिती निवळल्यावर लग्न करू असे आरोपीकडून सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने त्याच्या विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही फिर्याद रद्द करण्यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली. आमच्यामध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले होते, त्यामुळे बलात्कार आरोप होऊ शकत नाही, असा युक्तिवाद आरोपीकडून करण्यात आला.

न्या सुनील देशमुख आणि न्या नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद मान्य केला. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या जबाबात आरोपी लग्नाला तयार होता हे स्पष्ट होते. त्यांच्या मध्ये असलेल्या प्रेमामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यामुळे आता लग्नाला नकार दिल्यानंतर त्याच्यावर बलात्काराचा आरोप लागू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : माझी विनंती आहे कोर्ट आदेश डेसिबल पातळी पाळून गणेश उत्सव साजरा करावा - मेधा कुलकर्णी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT