Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

अदिती तटकरे यांनी चौथं महिला धोरण आणलं. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे त्यांना माहित होते. त्यातील काही माहिती अजित पवार यांनी दिली.

Sandip Kapde

Ajit Pawar: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे.

यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं मुल जन्माला आल्यानंतर मुलाचं नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असं असायचं पण आता आपण नविन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचं नाव, नंतर वडिलांच आणि पुढे आडनाव अस असणार आहे. कारण शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतो जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला ६ टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर १ टक्का सवलत आहे. ५० लाखाचं घर असलं तर ५० हजार रुपये वाचतात. यापुढे महिलांनी नवरोबाला सांगावं घर घ्यायचं असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT