chandrashekhar bawankule chandrashekhar bawankule
महाराष्ट्र बातम्या

‘महिनाभरात डेटा तयार होऊ शकतो; सरकारची भूमिका संशयास्पद’

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) चांगलाच झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाने इम्पीरिकल डेटाची (Imperial data) अट पूर्ण केली गेली नसल्याचे निकालात स्पष्ट केले. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी एक महिन्याचा आत डेटा तयार होऊ शकतो, असे म्हटले आहे.

केंद्राला इम्पीरिकल डेटा द्यायला सांगा किंवा तसा डाटा राज्य सरकार तयार करेपर्यंत निवडणूकच रद्द करा, अशी मागणी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. राज्य सरकारद्वारे तशी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने इम्पीरिकल डेटाची अट पूर्ण केली गेली नसल्याचे स्पष्ट केले.

यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. नाना पटोले (Nana Patole) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नेहमी खोटो बोलले आहे. राज्य सरकारची भूमिका नेहमीच संशयास्पद होती, असेही ते म्हणाले. इम्पीरिकल डेटा महिनाभरात तयार होऊ शकतो. आम्ही सरकारला मदत करण्यास तयार आहोत. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आम्ही डेटा तयार करू असे म्हटले होते, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT