Sanjay Raut and Dada Bhuse 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : कांदा हे गरीबाचं खाणं, श्रीमंतांचं नाही, हा मस्तवालपणा...; संजय राऊतांची जोरदार टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने सुरू झाली आहे. त्यातच मंत्री दादा भुसे यांनी २-४ महिने कांदा खाल्ला नाही तरी फरक पडणार नाही असं म्हटलं होतं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले की, सामान्य माणसाने कांदा आणि भाकरी खायचा नाही का? कांदा गरीबाचं खाणं आहे. श्रीमंतांचं खाणं नाही. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. पण सरकार म्हणत असेल तर एखाद्या गोष्टी खायला मिळत नसेल तर खाऊ नये. मग तुम्ही सरकार कशासाठी आहे.

दादा भुसे यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, हे जे दीडशहाणे मंत्री आहेत, ते कालपर्यंत कृषीमंत्री होते. त्यांना महाराष्ट्राची स्थिती माहित आहे का? कांद्यामुळे भाजपचं सरकार गेले होतं. महाराष्ट्रात देखील तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्टी मिळत नाही, म्हणून ती खावू नये, मग तुम्ही उपलब्ध करून द्या, असा सल्लाही राऊत यांनी सरकारला दिला आहे.

चंद्रयान यांच्यावरून क्षेयवाद सरू झाल्याचा प्रश्न विचारताच, राऊत म्हणाले की, यशाचं श्रेय वैज्ञानिकांचं आहे. वर्षानुवर्षे शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. मागील ३० वर्षांपासून सुरू आहे. त्याचं श्रेय वैज्ञानिकांनाच द्याव लागेल. हे राजकीय पक्षाने, श्रेय घेऊन नाही. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी श्रेय घेण्यात आलं. मग चीनवर का सर्जिकल स्ट्राईक करत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT