ujani dam sakal, solapur
महाराष्ट्र बातम्या

औज बंधाऱ्यात १३ दिवस पुरेल इतकेच पाणी! उजनीतून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी; १० मार्चनंतर धरणातून सुटणार पाणी

महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, महापालिकेने अगदी काटेकोर नियोजन केले तरीदेखील एप्रिलनंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : औज व चिंचपूर बंधाऱ्यांची जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतरच सोलापूरकरांना उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या औज बंधाऱ्यात १५ मार्चपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने सोलापूरकरांना काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

जुळे सोलापूर व परिसरास औज व चिंचपूर बंधाऱ्यातून दररोज पाणीपुरवठा केला जातो. औज बंधाऱ्यामध्ये सध्या १०-११ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने उजनी धरण ६० टक्क्यांपर्यंतच भरले होते. सध्या उजनी धरण उणे १७ टक्के झाले असून तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. दुसरीकडे हिप्परगा तलावदेखील तळ गाठत आहे. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा उजनी धरणावरच अवलंबून आहे. महापालिका प्रशासनाने संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन उजनीतून पाणी उपसा करण्यासाठी दुबार पपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, महापालिकेने अगदी काटेकोर नियोजन केले तरीदेखील एप्रिलनंतर पाच दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

औज बंधाऱ्यात १० ते १२ दिवस पुरेल इतकेच पाणी

औज बंधाऱ्यात १५ मार्चपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीपुरवठ्यात अडथळा होऊ नये, यासाठी १० ते १२ तारखेदरम्यान सोलापूरला पाणी पोचेल, अशा नियोजनाने पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

- व्यंकटेश चौबे, अभियंता, सार्वजनिक आरोग्य विभाग, सोलापूर महापालिका

१० तारखेनंतर उजनीतून सोलापूरसाठी पाणी

महापालिकेने पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. औज व चिंचपूर बंधाऱ्यांतील पाणी साठ्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून उजीतून पाणी सोडण्याचे निश्चित होईल. १० तारखेनंतर गरजेनुसार सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाईल. त्यावेळी नदीकाठचा विद्युत पुरवठा बंद ठेवला जाईल.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT