Param Bir singh Google
महाराष्ट्र बातम्या

Param bir Singh : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

संतोष कानडे

मुंबईः अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबिर सिंह यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे.

परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणलं होतं.

परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.

आज राज्य सरकारने त्यांचं निलंबन मागे घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT