MLA Ravi Rana allowed to visit Maharashtra  MLA Ravi Rana allowed to visit Maharashtra
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी : आमदार रवी राणा यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : अमरावतीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टाने दिली आहे. अमरावती महापालिकेच्या आयुक्तांवर शाहीफेक केल्यानंतर रवी राणा दिल्लीला गेले होते. यानंतर त्यांना एक आठवड्याची ट्रांझीक बेल देण्यात आली. (MLA Ravi Rana allowed to visit Maharashtra)

छत्रपती शिवाजी महारांचा पुतळा बसवण्यावरून सुरू झालेला वाद चांगलाच तापला होता. याच वादातून अमरावती महापालिकेच्या आयुक्तांवर शाहीफेक करण्यात आली होती. यानंतर आमदार रवी राणा दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्री एकाएकाला फसवण्याचा प्रयत्न करीत आहे. मला आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना फसवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांवर यासाठी दबाव टाकण्यात येत होता. शिवजयंतीला मी अमरावतीला जाणार होतो. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही अमरावतीत येऊ नका, असे मला पोलिसांकडून सांगण्यात आले होते. पोलिस मला मदत करीत असल्याने आणि कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून मी अमरावतीत न जाण्याचा निर्णय घेतला, असेही रवी राणा (Ravi Rana) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT