Bacchu Kadu News esakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu : बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

नाशिक सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

रोहित कणसे

सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांना आमदार पदावरून पायउतार करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

नाशिक सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानुसार, त्यांनी पदावर राहणं अनुचित आहे. न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेला अद्याप स्थगिती मिळालेली नसून फक्त अपिलाचा निर्णय होईपर्यंत शिक्षेचं निलंबन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतर्फे करण्यात आली आहे.

या शिक्षेला अनुसरूनच बच्चू कडू यांना आमदार पदावर राहता येणार नाही. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना द्यावेत अशी मागणी करणारी रिट याचिका अजित रानडे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

बच्चू कडू यांनी नाशिक आयुक्तांवर हात उगारल्याच्या प्रकारणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये अंपगाच्या मागण्यांसाठी त्यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT