PM Modi Pune Visit esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Pune Visit : पवारांनी थोपटली मोदींची पाठ अन् सगळ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; नेमकं काय घडलं?

संतोष कानडे

पुणेः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येत आहे. मोदींच्या दौऱ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होत असला तरी प्रत्यक्षात मंचावर वेगळाच प्रसंग बघायला मिळाला.

दगडूशेठ मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा एसपी कॉलेज मैदानाकडे निघाला. आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहात मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते.

दीपक टिळक यांच्या बाजूला शरद पवारांची आसनव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलले होते.

दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील हास्य लपून राहिलं नव्हतं. शिवाय पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप दिल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे.

मोदींच्या हस्ते आज पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण तसेच पंधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो घरांचे हस्तांतरण करणार आहेत. या दरम्यान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान काँग्रेससह अनेक सामाजिक संस्थांकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांना मणिपूरच्या मुद्द्यावर काळे झेंडे दाखवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT