Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde Video : देवेंद्र फडणवीस लोकप्रिय उपमुख्यमंत्री मग अजित पवारांचं काय? शिंदे बोलले तर चर्चा होणारच!

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. मोदींनी सुरुवातीला लोकमान्य टिळक स्मारक समितीच्या वतीने दिला जाणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' स्वीकारला. त्यानंतर पुणे मेट्रोसह विविध विकासकामाचं लोकार्पण केलं. त्यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलले त्याची राज्यात चर्चा सुरु झाली आहे.

बरोबर एक महिन्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट सोबत घेऊन सत्ता पक्षाला समर्थन दिलं. अजित पवारांच्या सोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर त्यांच्या गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महत्त्वाची खाती अजित पवारांच्या गटाला मिळालेली आहे.

मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट अस्वस्थ असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. वरवर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं स्वागत केलं असलं तरी त्यांच्या गटातल्या आमदारांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. त्यातच आज पुण्यातल्या कार्यक्रमात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करतांना लोकप्रिय शब्द वापरला.

अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी एक जाहिरात राज्यातल्या महत्त्वाच्या दैनिकांमधून प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे कसे जास्त लोकप्रिय आहेत, हे नमूद करण्यात आलेले होते. त्यानंतर अजित पवारांचं बंड झालं होतं.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचं उद्घाटन मंगळवारी पार पडलं. यामध्ये 'वनाज ते रुबी हॉल' आणि 'सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मुख्यालय' या मर्गांचा समावेश आहे. या विस्तारित मार्गांमुळं पुणेकरांचा प्रवास सुसह्य होणार आहे. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी बोलतांना फडणवसांना 'लोकप्रिय' ही उपाधी दिली आहे. मात्र दुसरीकडे अजित पवारांचा उल्लेख मात्र कोरडाच केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

भाषणाच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे उपस्थित मान्यवरांचा उल्लेख करत होते. ते म्हणाले की, विकासकामांच्या लोकार्पण, भूमिपूजन प्रसंगी उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे, चंद्रकांतदादा, दिलीप वळसे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सर्व खासदार, आमदार मोठ्या संख्येने उपस्थित पुणेकर...

यावेळी शिंदेंची फडणवीसांचा उल्लेख 'लोकप्रिय' असा केला, मात्र अजित पवारांचा उल्लेख करतांना थेटपणे केला आहे. त्यांच्या या बोलण्यातील नेमकेपणाची राज्यात चर्चा सुरु झालीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT