महाराष्ट्र बातम्या

PM Modi Pune Visit : मोदींकडून दगडूशेठ मंदिरात पूजा; रस्त्याच्या दुतर्फा जल्लोष करत पुणेकरांनी केलं पंतप्रधानांचं स्वागत

संतोष कानडे

पुणेः लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज प्रदान करण्यात येईल. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आलेले आहेत. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधकांकडून कडाडून विरोध होत आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.

मोदींच्या हस्ते आज पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण तसेच पंधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो घरांचे हस्तांतरण करणार आहेत. काँग्रेससह अनेक सामाजिक संस्थांकडून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करत आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून पंतप्रधानांना मणिपूरच्या मुद्द्यावर काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत.

दरम्यान, पुण्यात दाखल झाल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ मंदिराकडे निघाला. मोदींच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात पूजा संपन्न झाली. त्यानंतर ते पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाकडे रवाना झाले आहेत. कार्यक्रमामध्ये मोदी काय बोलणार, याकडे सबंध देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

ठाकरे गटातील नेत्याला मारण्यासाठी चोरबाजारातले चॉपर अन् देशी पिस्तुलचा वापर, प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात धक्कादायक माहिती समोर!

डोळ्यांत जळजळ किंवा खाज सुटल्यास काय करावे? पाणी मारावे की आय ड्रॉप टाकावा? पाहा डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला...

Latest Marathi News Live Update : कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, कोणत्या क्रमांकावर खेळणार? भारताच्या Playing XI मध्ये 2 बदल, टॉस जिंकला अन्..

SCROLL FOR NEXT