Praful Patel  sakal
महाराष्ट्र बातम्या

Praful Patel: प्रफुल्ल पटेल अध्यक्षपद घेणार नाहीत, जयंत पाटलांच्या नाराजी बद्दल केले मोठे विधान

आज राष्ट्रवादीची कुठलीही बैठक बोलावली नव्हती, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याचं जाहीर केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चांगलीच चर्चा रंगली आहे. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. अशा स्वरूपाच्या आज दिवसभरात बातम्या आल्या होत्या त्यावर राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेत दिवसभरातील घडामोडींवर भाष्य केलं आहे.

ते बोलताना म्हणाले की, 'आज कोणत्याही प्रकारची पक्षाची बैठक झाली नाही. बैठक बोलवण्यात आली नव्हती. आज निर्णय होणार असल्याच्या बातम्या आल्या त्यामध्ये तथ्य नाही. आज कोणताही निर्णय झालेला नाही. आज शरद पवार यांनी आलेल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही असं पटेल यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

तर पुढे ते म्हणाले की, 'आम्ही कोणती बैठक घेतली तर त्याबाबत आम्ही तुम्हाला कळवू. बैठकीबद्दल तुम्हाला सांगू. आज दिवसभरात आलेल्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही. आज दिवसभरात नवीन अध्यक्ष कोण होणार यांच्या बातम्या आल्या आहेत त्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी खुलासा केला आहे.

'आम्ही उद्या शरद पवार यांना भेटू. त्यांनी काही निर्णय घेतला तर तो सांगण्यात येतील. तर छगन भुजबळ यांनी दिलेली त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया होती. त्यावरून नावाच्या चर्चा झाल्या ही चुकीची बाब आहे असंही पटेल म्हणाले आहेत. तर बैठक होईल तेव्हा मी त्याचा निमंत्रक असेल तेव्हा मी सांगेन' असंही ते म्हणालेत.

शरद पवार यांनी अजून निर्णय घेतलेला नाही. त्यांना निर्णय घेण्यासाठी वेळ द्या. तसेच काही शरद पवार यांनी काही निर्णय घेतला तर तो कळवण्यात येईल असंही ते म्हणालेत.

जयंत पाटील नाराज नसल्याचंही पटेल यांनी म्हंटलं आहे. ते त्यांच्या कारखान्याच्या कामासाठी पुण्याला गेले होते. त्यांच्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या त्यावर पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

तर मी अध्यक्षपद घेण्यास तयार नसल्याचंही पटेल यांनी यावेळी सांगितलं आहे. मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही, आमचा पक्ष एक आहे आणि एकच राहिलं, राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही अंतर्गत कलह नसल्याचंही प्रफुल्ल पटेल बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

Viral News : आजोबांनी इंग्रजांना दिले होते ३५००० रुपयांचे कर्ज, नातू १०९ वर्षांनंतर करणार कोट्यवधी वसूल, ब्रिटिश सरकारला पाठवणार नोटीस

'परदेसी..' गाण्यामुळे झाली सुपरस्टार, संगीतकाराबरोबर अफेअर आणि आईचा विरोध; आता काय करते ही अभिनेत्री?

Sun on Earth : 100,000,000°C ची उष्णता! चक्क पृथ्वीवर 'सूर्य' बनवतायत बिल गेट्स, जगभर चर्चेत असलेला 'Infinity One' प्रोजेक्ट काय आहे?

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

SCROLL FOR NEXT