Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : सध्या अजितदादांचं खच्चीकरण सुरू; पडळकरांच्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसचा दावा

रवींद्र देशमुख

मुंबई - दोन दिवसांपूर्चीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. पडळकरांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचं पिल्लू असं म्हटलं होतं. यावरून विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, आमदार अपात्रतेबाबतचा मुद्दा सध्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. मात्र आता अजित दादांचं खच्चीकरण चालले आहे. गोपीचंद पडळकर सारखा सत्ता पक्षातला आमदार त्यांना काय काय बोलतो. मात्र सत्तेसाठी लाचारी करणारे त्यावर कसं उत्तर देतील. हे महाराष्ट्र पाहतोय. मात्र ते उत्तर देऊ शकले नाही. यामुळे रोहित पवार बोलते ते सत्य आहे, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं. रोहित पवार म्हणाले होते की, अजित पवार गटात सामील होण्यासाठी आमदारांना ब्लेकमेल करण्यात येत आहेत.

दरम्यान आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष वेळ काढूपणा करत आहेत. एका विशिष्ट पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे सरकार वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आल्यानंतरही वेळ काढूपणा होत आहे. निकाल काही लागो, पण तो लवकर झाला पाहिजे, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.

देशाच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे, लोकांच्या स्वप्नाशी त्यांना काहीही देणे- घेणे नाही. लोकसभेचे नवीन सभागृह बांधले आहे. त्यामध्ये या सरकारला पुढच्या काळात जनता प्रवेश करू देणार नाही, हे त्यांचं शेवटचे अधिवेशन ठरेल, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात व्यावसायिकाच्या दुकानातून दहा लाखांची रोकड लंपास; कामगाराविरुद्ध खडक पोलिसांत गुन्हा

Latest Marathi News Live Update : मुंबईचं तापमान वाढणार, काही जिल्ह्यांमध्ये होणार पावसाची बरसात

Pune Crime: हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू; चेअरमनसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, नेमकं काय घडलं!

पुस्तकावरून वाद पेटला; शिंदे गटाच्या आमदाराचा संताप अनावर; प्रकाशकाला फोनवर अश्लील धमक्या, ऑडिओ व्हायरल

Free Education for Girls Maharashtra : मुलींना उच्चशिक्षण मोफत, पण विकास शुल्कचे बंधन; महाविद्यालय आकारतात 15 ते 25 हजार रुपये

SCROLL FOR NEXT