parambir singh esakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंहांच्या अडचणी वाढल्या; लुकआउट नोटीस होणार जाहीर

विनायक होगाडे

ठाणे : कोपरी पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी २८ आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्याचे काम सुरू केले आहे. या गुन्ह्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव आहे. केतन तन्ना यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

याशिवाय याआधी देखील मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केलेली आहे. 28 जुलै रोजी जाहीर केलेल्या या नोटिशीमुळे परमबीर सिंग यांना आता परदेशात जाता येणार नाही. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये चार गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे.

त्या बरोबरच त्यांच्यावर होणारे आरोप-प्रत्यारोप आदींमुळे प्रकरण वाढत चालले आहे. दरम्यान परमबीर सिंग मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात "लुक आऊट" नोटीस जारी केली असून त्याची माहिती विमानतळ आदी ठिकाणी देण्यात आल्याचे सूत्रांची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी देश सोडून बाहेर जाऊ नये, परदेशात जाऊ नये यासाठी ही "लुक आऊट" नोटीस जारी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

SCROLL FOR NEXT