Pune News esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Crime : 'लिव्ह इन'मधले नखरे... त्याला उठवायला गेली अन् मार खाऊन आली

सकाळ डिजिटल टीम

पुणेः मोठ्या शहरांमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढलं आहे. या जोडप्यांमधले वादही टोकाचे असतात. पुण्यात एका प्रकरणात पार्टनरला झोपोतून उठवायाल गेलेल्या तरुणीला मार खावा लागला आहे. आता हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यातमध्ये पोहोचलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत ३४ वर्षाची तरुणी आणि ३८ वर्षाचा तरुण राहतात. विशेषतः हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. एकाच कंपनीमध्ये काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मागील १ वर्षांपासून ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

हेही वाचाः सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

१९ डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी तरुणी ही तिच्या जोडीदार जो गाढ झोपेत होता त्याला उठवण्यासाठी गेली. मात्र तो झोपेतून उठण्यास मनाई करत होता. तरुणीने पुन्हा एकदा जबरदस्तीने त्याला उठवायला प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणाला राग आला आणि त्याने तिला मारहाण केली.

मारहाणीनंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि जोडीदाराविरोधात तक्रार दिली. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढीत तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT