Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : अभ्यास सोडून आम्ही इतर ठिकाणीच पुढे असायचो; पवारांनी सांगितला पूनावालांसोबतचा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पतंगराव कदम यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं.पतंगराव कदम यांच्या नावाचा पहिला पुरस्कार आदर पूनावाला यांना आज देण्यात आला

या कार्यक्रमामध्ये बोलतांना शरद पवार म्हणाले की, पतंगराव अतिशय आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शून्यातून विश्व उभे केले. सांगली जिल्ह्यातील एका गावातून आले होते. रयत शिक्षण संस्थेत कमवा व शिका या योजनेअंतर्गत ते शिकले. पुण्यात आले आणि भारती विद्यापीठ सारखी शिक्षणसंस्था उभी केली.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

''पतंगराव कदम यांनी उभे केलेले काम पाहताना तुम्हा-आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा पहिला पुरस्कार आदर पुनवाला यांना देण्यात आल्याचं समाधान आहे. आदर पुनावाला यांचे वडील सायरस पूनावाला आणि मी एकत्र शिकलो. आमच्या दोघात एक वैशिष्ट्य होते. अभ्यास सोडून इतर ठिकाणी आम्ही पुढे असायचो...

आज जगात सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. जगात जवळपास 160 देशात पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेली वॅक्सिन वापरली जाते. हे सर्व करत असताना सामाजिक भान राखण्याची देखील त्यांनी काळजी घेतली आहे. शहरातील कचरा वाहून नेण्यासाठी जवळपास 100 हुन अधिक वाहने त्यांनी पुणे महानगरपालिकेला दिली.''

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, पतंगराव यांचा अनेक वर्षाचा कालखंड रयत शिक्षण संस्थेत गेला. 50 वर्षांपासून मी त्या संस्थेची जबाबदारी घेतलो आहे. या काळात ते आमचे खंदे समर्थक होते. त्यांनी त्यांची रयतशी असलेली बांधिलकी सोडली नाही.

आज घडीला संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणे गरजेचे आहे. भारती विद्यापीठ त्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आहे.रयत शिक्षण संस्थेत ज्या सेवाभावी विचाराचे अध्यापक आहेत तसेच भारती विद्यापीठमध्येही आहेत. या संस्थेतील अध्यापक देशाला उपयुक्त असणारे कार्य करतील, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs NZ: पाकड्यांशी भिडायला किवींनी संघात १, २ नव्हे तर ३ बदल केले, पण पावसाने सगळे गणितच बिघडवले! आता पुढचे समीकरण काय?

Pune Traffic : सायलेन्सर व ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हविरोधात वाहतूक शाखेची कारवाई; ३४८ बुलेटस्वरांकडून तीन लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसूल

Trump Tariff: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डोनाल्ड ट्रम्प भारताकडून किती टॅरिफ आकारणार? हा कर फक्त १५० दिवसांसाठी का लादला?

२०२४ ला डेटिंगची चर्चा, २०२५ मध्ये नातं जगजाहीर; आता शिखर धवनने आयरिश प्रेयसीसोबत लग्न केलं, सोफी शाइन आहे तरी कोण? पाहा फोटो

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; तासन् तास उशिरा धावतात पॅसेंजर गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण

SCROLL FOR NEXT