Rahul Gandhi on PM Modi sakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi: राहुल गांधी ठाम! पण काँग्रेस नेता म्हणतो माफी मागाच; काय प्रकार आहे वाचा

राहुल गांधींना नुकतीच खासदारकी गमवावी लागली. जर त्यांनी माफी मागितली असतील तर ही परिस्थिती ओढवलीच नसती असं भाजपचं म्हणणं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नागपूर : राहुल गांधी यांना नुकतीच खासदारकी गमवावी लागली. राहुल गांधींनी जर माफी मागितली असतील तर त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवलीच नसती असं भाजप वारंवार सांगत आहे. मोदी आडनावाची बदनामी झाल्याच्या मुद्द्यावरुन हा विषय चर्चेत आला. पण राहुल गांधी माफी न मागण्यावर ठाम आहेत. पण आता राज्यातील एका काँग्रेस नेत्यानंच राहुल गांधींनी माफी मागावी अशी जाहीर इच्छा व्यक्त केली आहे. (Rahul Gandhi is firm on not apoligize But Congress leader Ashish Deshmukh says to apologize)

काँग्रेस नेते आशिष देशमुख म्हणाले, राहुल गांधींनी जे विधान केलं त्यासंदर्भात माझं असं म्हणणं आहे की ओबीसी समाज हा काँग्रेसच्या पाठीशी मोठ्या प्रमाणावर उभा आहे. पण जर हा समाज जुन्या कुठल्या विधानामुळं दुखावला गेला असेल तर राहुल गांधींनी त्यांची माफी मागावी, त्याच्यात गैर काय आहे. शेवटी पक्षाचाच फायदा होणार आहे. यापूर्वी राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' किंवा राफेलच्या संदर्भात सुप्रीम कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली आहे. मग देशातील ५५ टक्के ओबीसी जर दुखावले गेले असतील तर मोठ्या मनानं राहुल गांधी माफी मागितली तर त्यात काही गैर नाही.

दरम्यान, राहुल गांधींच्याविरोधात भूमिका घेतल्यानं तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरही वारंवार आक्षेप नोंदवल्यानं देशमुख यांच्यावर काँग्रेस केंद्रीय समितीकडून शिस्तभंगाची कारवाई सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चेवर बोलताना देशमुख यांनी आपली बाजू मांडली.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

कर्नाटकात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींनी पंतप्रधानांना टार्गेट करताना मोदी आडनावाचे लोक चोर कसे? अशी टिप्पणी केली होती. याविरोधात गुजरातमधील पुर्नेश मोदी नामक भाजपच्या आमदारानं त्यांच्याविरोधात कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता. दोन वर्षानंतर कोर्टानं यावर निर्णय देताना राहुल गांधींना दोषी ठऱवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालायानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT