महाराष्ट्र बातम्या

Railway News: रेल्वे स्टेशनवर करत होते अनाधिकृत व्यवसाय; फेरीवाल्यांवर मध्य रेल्वेची बंपर कारवाई !

Chinmay Jagtap

Railway News: रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत गेल्या सहा महिन्यांत अनधिकृत फेरीवाल्याविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २१ हजार ७४९ गुन्हे नोंदविण्यात आले असून २१,७३६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २.७२ कोटींचा दंडही वसूल केला आहे.

न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करून १५० मीटरवर सीमारेषा आखण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार, रेल्वेने सीमारेषा आखली होती. तरीही नियम तोडून अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करत आहेत.

मध्य रेल्वेकडून अनेकदा या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असली तरी त्यांच्यावर अंकुश लावण्यात रेल्वेला यश आले नाही. याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मोहीम राबवली.

या मोहिमेंतर्गत ट्रेनमध्ये २१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ फेरीवाल्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालावधीत नोंदवलेल्या १७ हजार ९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान झालेली कारवाई

विभाग गुन्हे - अटक - दंड

मुंबई विभाग ९४.७७ लाख

भुसावळ विभाग १.१५ कोटी

नागपूर विभाग २७.६१ लाख

पुणे विभाग १२.७१ लाख

सोलापूर विभाग २१.९२ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT