raj thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरे दिल्लीला रवाना, महायुतीमध्ये जाण्याचे संकेत? फडणवीस, बावनकुळेही दिल्लीत...

Raj Thackeray MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांचा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होईल, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या दिल्लीवारीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

संतोष कानडे

Raj Thackeray MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे तातडीने दिल्लीकडे रवाना झाले आहे. त्यांचा पक्ष महायुतीमध्ये सहभागी होईल, असं सांगितलं जात आहे. त्यांच्या दिल्लीवारीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे भाजपसोबत जातील, असं बोललं जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निरोप त्यांनी राज ठाकरेंना दिला होता, असं सांगितलं गेलं.

त्याच दिवशी राज ठाकरे भाजपसोबत जातील, असं सांगितलं जात होतं. राज ठाकरेंनी पत्रकार परिषदही घेतली पण दुसऱ्याच मुद्द्यावर. आज पुन्हा त्यांच्या भाजप सहभागाविषयी बोललं जातंय कारण ते दिल्लीला रवाना झाले आहेत. 'एबीपी माझा', 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे.

दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीमध्ये आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे राज यांच्यासोबत आहेत. राज नेमकं कोणत्या कारणाने दिल्लीला रवाना झाले आणि ते खरंच भाजपसोबत एनडीएमध्ये सहभागी होतील का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली. भेटीनंतर संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोघांमध्ये भेट झाली असेल. या भेटीतून लगेच युतीची चर्चा करण्यात अर्थ नाही. यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरेंची भेट झाली होती.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली होती. ''आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यामुळे त्यांची भेट झाली असेल. जर या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मनसे आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. ते एकत्र आले तर चांगलंच आहे. कारण भाजपने नेहमीच बेरजेचं राजकारण केलेलं आहे.'' यावरुन अनेकांना राज ठाकरे सोबत यावेत, असं वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT