Raj Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: करोडो रुपयांचा फ्लायओव्हर पडतो, मंत्र्याचा राजीनामा नाही तरी लोक मतदान करतात; राज ठाकरे संतापले

Sandip Kapde

Raj Thackeray: महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत आहे तोच विरोधात आहे, अशी घाणेरडी परिस्थिती राज्यात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. जगाच्या पाठिवर अशी स्थिती फक्त महाराष्ट्रात आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. चिपळूण येथील फ्लायओव्हर पडल्याच्या घटनेवरुन देखील राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात राज ठाकरे बोलत होते.

१४० कोटी रुपयांचा फ्लायओव्हर पडला -

चिपळूण येथील १४० कोटी रुपयांचा फ्लायओव्हर पडला. आमच्याकडे एक दिवसाची बातमी होते त्यापुढे काही होत नाही. संबंधित मंत्र्यांचा कोणी राजीनामा देखील मागत नाही. रविंद्र चव्हाण म्हणाले होते गणपतीसाठी एक लाईन सुरु करतो. जे करोडो रुपये घातले ते सगळे वाहून गेले, सगळं वाया गेलं. करोडो रुपये फुकट जातात तरी या देशात मतदान होतात निवडणुका होतात, असे राज ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)


टोलनाक्याबाबत काय म्हणाले राज ठाकरे?

९० कॅमेरे प्रत्येक टोलनाक्यावर लागले. किती गाड्या येतात किती जातात हे कळतच नाही. रोज किती गाड्या रजिस्टर होत आहेत. ठाणे, मुंबई ओरटीओमध्ये हजार गाड्या रजिस्टर होतात आणि टोलवर गाड्या तेवढ्याच, असं कसं होईल?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  

अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर -

राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रात सगळी विचित्र परिस्थिती झाली आहे. एवढी घाणेरडी विचित्र परिस्थिती मी बघितली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्यात असेल एक पक्ष आहे ज्यातील अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर आहे. सत्तेत शिवसेना बाहेर शिवसेना, सत्तेत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी, अशी परिस्थिती जगात कधी बघितली का?, याला राज्य म्हणायचं का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT