Raj Thakreay Raj Thakreay
महाराष्ट्र बातम्या

मशिदींवरील भोंगे काढावेच लागतील, अन्यथा...; राज ठाकरेंचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे. मशिदींवरील भोंग्याबाबत आधीही बोललो होतो. परंतु, ते अद्यापही सुरूच आहे. प्रार्थनेला विरोध नाही. मात्र, भोंगे काढावे (Remove masjid speaker) लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागले. अन्यथा आम्ही भोंग्यांविरोधात दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचवू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj thackeray) यांनी दिला.

कोरोना आटोक्यात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरील मुद्दा उपस्थित करून सरकार व मुस्लिमांवर निशाणा साधला.

मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. याला अनेकदा विरोध झाला आहे. पहाटे पाच वजतापासून भोंगे वाजत असल्याने झोप होत नाही. परीक्षेच्या काळात मुलांचा अभ्यास होत नाही. असे अनेक कारणं पुढे करून भोंग्यापासून सुटका मिळावी अशी मागणी होत आहे. दोन वर्षांनंतर झालेल्या मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे. आमचा प्रार्थनेला कोणताही विरोध नाही. मात्र, पहाटेपासून भोंगे वाजत असल्याने त्रास होतो. मशिदीवरील भोंगे काढा (Remove masjid speaker). सरकारने यावर निर्णय घेतलाच पाहिजे. अन्यथा या मशिदीवर भोंगे वाजतील त्याच्यासमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचली जाईल, असा इशारा राजे ठाकरे (Raj thackeray) यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT