Assembly Elections  esakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Elections : राजस्थान विधानसभेसाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात?, केली 'ही' तयारी

संतोष कानडे

मुंबईः राजस्थानसह देशातील पाच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. शिवसेना पक्ष जो की एनडीएमध्ये सहभागी आहे. तो राजस्थान विधानसभेच्या निवडणुका लढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेने तशी तयारीदेखील सुरु केलीय.

एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष हा NDAचा घटकपक्ष आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार की एकत्रित? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे राजस्थानच्या दौऱ्यावर होते. शिंदेंच्या जयपूर दौऱ्यात राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंग गुढा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

तिथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या विस्ताराची योजना सांगितली होती. 'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी राजस्थान निवडणुकीत सेनेचे उमेदवार उभे करण्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) पत्र लिहिलं आहे.

या पत्रात निवडणूक आयोगाल ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत परवानगी द्यावी, अशी विनंती केल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेमुळे राजस्थानमध्ये भाजपला फायदा होईल का? की भाजपची दुसरीच काहीतरी खेळी आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT