Ram Mandir Inaguration 
महाराष्ट्र बातम्या

मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे आहेत का? भाजपचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाल्याची काँग्रेसची टीका

अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावरुन आता राजकारण पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर उद्घटनाचे निमंत्रण नाकारले आहे.

Sandip Kapde

Ram Mandir Inaguration: अयोध्येत २२ जानेवारीला रामल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावरुन आता राजकारण पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर उद्घटनाचे निमंत्रण नाकारले आहे. काल उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (Swami Avimukteshwaranand Saraswati) यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत जाणार नसल्याचे म्हटले आहे.

मंदिराचे बांधकाम पूर्ण न करता प्रभू रामाचा अभिषेक सोहळा आयोजित करणे हे हिंदू धर्माच्या तत्त्वांचे पहिले उल्लंघन आहे. एवढी घाई करण्याची गरज नव्हती, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी स्पष्ट केले. दरम्यान काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. भाजपचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाल्याची  टीका काँग्रेसने केली आहे.

sachin sawant post

हिंदू धर्मात काय योग्य काय अयोग्य हे सांगण्यासाठी भाजप आणि मोदी  शंकराचार्यांपेक्षा मोठे का? अपूर्ण बांधकाम झालेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करणे योग्य नाही असे स्पष्ट मत चारही पिठाच्या शंकराचार्यांनी व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)

भाजपाला रामाबद्दल आस्था नाही पण निवडणुकीत रामाच्या नावाचा वापर करावयाचा आहे. भाजपा संघाचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाले आहे, असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangre Patil:''मी कुठल्या नियमाचा भंग केला का?'' विश्वास नांगरे पाटलांची पत्रकार परिषद; वादाच्या मुद्द्यावर केला सविस्तर खुलासा

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला दोन सामन्यांतही डेब्यू का नाही? अखेर टीम इंडियाच्या सहाय्यक प्रशिक्षकाने सांगितलं खरं कारण

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे - जय पवार

'सगळ्या अ‍ॅक्टरचे अफेअर्स असतात' फराहने प्रश्न विचारताच रितेशने दिली 'अशी' प्रतिक्रिया, Viral Video

Sonai News : सोनईतील सावित्री सत्यवानासाठी आधार‘वड’; पतीला कोरोनात अंधत्व आल्यानंतर कुटुंबासाठी ‘ती’चा अहोरात्र संघर्ष

SCROLL FOR NEXT