Uddhav Thackeray News esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'मी स्वतः उद्धव ठाकरेंना बारसुची जागा दाखवली होती, ते सरड्यासारखा रंग बदलत आहेत...'

संतोष कानडे

मुंबईः रत्नागिरीतल्या बारसुमध्ये होणाऱ्या रिफायनरीला मोठ्या प्रमाणावर विरोध होतांना दिसून येत आहे. ठाकरे गटाने रिफायनरीला कडाडून विरोध केल्याने शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका केली आहे.

बारसु येथील स्थानिकांनी रिफायनरीला विरोध केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र प्रकल्प चांगला असेल तर यायला पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली.

बारसु येथील स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. त्यावरुन रामदास कदम यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना मी स्वतः त्यांना बारसुची जागा दाखवली होती. मात्र आता ते सरड्यासारखा रंग बदलत आहेत.

कदम पुढे म्हणाले की, जो प्रस्ताव तुम्हीच पाठवला त्याला आता का विरोध करत आहात? बारसुमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी ते जात असल्याचा आरोप कदमांनी केला.

दरम्यान, बारसु प्रकरण सध्या तापलेलं आहे. स्थानिकांनी सरकारसोबत चर्चा करावी, असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं होतं. स्थानिकांनी मात्र जमीन सर्वेक्षण थांबवल्याशिवाय चर्चा होणार नसल्याचा इशारा दिला होता.

सध्या हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे. परंतु आणखी तीव्र स्वरुपात आंदोलन होण्याची शक्यता आहे. राज्यातले मोठमोठे नेते याबाबत तोडगा काढण्यासाठी सरसावले असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT