Raosaheb Danve esakal
महाराष्ट्र बातम्या

VIDEO : दाजींचा नादच खुळा; दमलेल्या वारकऱ्यांसाठी दानवेंनी स्वत: बनवला चहा

आषाढी वारीनिमित्त वारकरी पायी चालत थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आषाढी वारीनिमित्त वारकरी पायी चालत थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमले आहेत.

पंढरपूर : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) वारकरी पायी चालत थेट पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमले आहेत. विठ्ठलाच्या सावळ्या रुपाचं दर्शन घेण्याचा मोह राजकीय नेत्यांनाही आवरता आला नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), भाजपचे अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) व माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

तसंच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त व वारकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटलांना पाहून वारकऱ्यांनाही त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर या मार्गावर दमलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक जण झटत असतात. पंढरपूर तालुक्यातील शिरसगाव मंडप येथील सुभाष वाघ यांचे फिरते हॉटेल पंढरपूरमध्ये लागले आहे. वारीमधील प्रत्येक विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाचं छोटं हॉटेल लावतात. त्यांच्या हॉटेलमध्ये केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना वाटला. आषाढी वारीसाठी पायी आलेल्या दिंडीमधील वारकऱ्यांना भेट घेत त्यांची विचारपूसही केली.

टाळ-मृदुंग, विणा, तुळशी वृंदावण घेऊन निघालेले वारकरी आता पंढरपुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी केला. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते महापूजा संपन्न झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT