Rashtriya Swayamsevak Sangh esakal
महाराष्ट्र बातम्या

RSS नं केलं हैदराबादचं नामांतर; ट्विटमध्ये दिलं नवं नाव

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलाय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (Rashtriya Swayamsevak Sangh) हैदराबादच्या (Hyderabad) नामांतराचा मुद्दा पुन्हा एका उपस्थित करण्यात आलाय. संघाच्या ट्विटमध्ये हैदराबादचा उल्लेख ‘भाग्यनगर’ (Bhagyanagar) असा करण्यात आला असून भाजप आणि संघाच्या अजेंड्यावर हैदराबादच्या नामांतराचा विषय पुन्हा चर्चिला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पुढील महिन्यात म्हणजे, 5 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत भाग्यनगर (हैदराबाद), तेलंगणा (Telangana) येथे आयोजित करणार आहे. ही अखिल भारतीय स्तरावरील सर्वसमावेशक समन्वय बैठक वर्षातून एकदा घेतली जाते.

या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat), सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शिवाय भारतीय मजदूर संघाचे हिरण्यमय पंड्या, बी. सुरेंद्रन, विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार, मिलिंद परांदे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान, श्रीमती निधी त्रिपाठी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda), बी. एल. संतोष, भारतीय किसान संघाचे दिनेश कुलकर्णी, रामकृष्ण राव, विद्या भारतीचे जी. एम. काशीपती, राष्ट्र सेविका समितीचे सुश्री अन्नदानम सिताक्का, रामचंद्र खराडी, वनवासी कल्याण आश्रमाचे अतुल जोग यांच्यासह 36 संस्थांचे अधिकारी सहभागी होणार असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. या बैठकीत पर्यावरण, कौटुंबिक प्रबोधन, सामाजिक समरसता या विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, या सगळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला असून भाजप यावरती कोणती प्रतिक्रिया देणार याकडं आता लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT