Dapoli Sai Resort scam esakal
महाराष्ट्र बातम्या

साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई! सदानंद कदमांनंतर तिसरी अटक Dapoli Sai Resort scam

रुपेश नामदास

दापोली येथील साई रिसोर्ट प्रकरणी कडक कारवाई सुरुच आहे. या प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली त्यापाठोपाठ दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका जयराम देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर आज या प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे. बीडीओने दिलेल्या तक्रारीनुसार सुधीर पारदुले यांना अटक करण्यात आली आहे.

सुधीर पारदुले हे मंडळ अधिकारी आहेत. तर त्यांना दापोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणात अनिल परब यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने कारवाईचा धडाका लावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात एका राजकीय पक्षाच्या माजी आमदाराने केला होता.

साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच सदानंद कदम यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं सत्र यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT