Vijay Shivtare vs Ajit Pawar in Baramati esakal
महाराष्ट्र बातम्या

Vijay Shivtare vs Ajit Pawar in Baramati: बारामतीत महायुतीचा मार्ग मोकळा? वर्षा बंगल्यावर शिवतारे-अजित पवार यांच्यातील वादावर पडदा! फडणवीसांच्या मध्यस्थीला यश

Vijay Shivtare vs Ajit Pawar in Baramati: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची माहिती आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद अखेर मिटला असून दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात मध्यस्थी करत ही समेट घडवून आणल्याची समोर आलं आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतल्या नेत्यांमधील वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी घोषित केली होती. अजित पवार आणि शरद पवारांवर हल्लाबोल करत बारामतीत पवारांविरोधात उमेदवारी अर्ज भरणारच असा निर्धार विजय शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे बारामतीत लोकसभेची तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिवतारे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने कारवाई केली पाहिजे, असं अजित पवार गटाच्या नेत्यांनी म्हटलं होतं. अशातच काल (बुधवारी ता. २७) पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय शिवतारे यांच्यासोबत वर्षा या शासकीय निवास्थानी चर्चा केली. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीनंतर विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्या समेट घडवून आणण्यास देवेंद्र फडणवीसांना यश आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आज विजय शिवतारे पत्रकारपरिषद घेऊ आपली भूमिका मांडणार असून ते बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय मागे घेऊ शकतात, अशी माहिती आहे.

विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती आहे. शिवतारे एक पाऊल मागे येण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा सुरू आहे. विजय शिवतारे आज पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती साम टिव्हीला विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Hate Campaign : "ही तुमची संस्कृती आहे का?"; ऑस्ट्रेलियात भारतीय उत्पादनांवर वर्णद्वेषी स्टिकर्स, भारतीयांविरोधात द्वेष का वाढतोय?

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराजवळ 'ही' झाडे लावणे मानले जाते शुभ; जाणून घ्या घरासाठी फायदेशीर असणारी रोपे!

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरण, उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Pune News : झाडणकाम वाढले, रस्ते स्वच्छ, उकिरडे झाले कमी

Rapido Crime : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी ‘रॅपिडो’वर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT