sugar 
महाराष्ट्र बातम्या

देशात यंदा साखरेच्या उत्पादनात 50 लाख टनांची घट 

अनिल सावळे

पुणे - देशात 2019-20 च्या गाळप हंगामात 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 169.85 लाख टन इतके झाले आहे. गतवर्षी याच तारखेला 219.66 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या हंगामात 449 साखर कारखान्यांपैकी 23 साखर कारखान्यांनी उसाच्या उपलब्धतेअभावी गाळप थांबविले आहे. गतवर्षी 521 साखर कारखान्यांनी गाळप घेतले होते. 

महाराष्ट्रात यंदा 15 फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन 43.38 लाख टन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत उत्पादन 82.98 लाख टन होते. या हंगामात 143 कारखान्यांपैकी आठ कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गतवर्षी 193 साखर कारखाने सुरू होते. म्हणजेच महाराष्ट्रात यंदा उसाचे प्रमाण कमी असल्यामुळे 50 कारखाने बंद आहेत. दुष्काळ आणि अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील साखर उद्योगाला बसला आहे. 

उत्तर प्रदेशात 119 कारखान्यांनी 66.34 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गतवर्षी 117 कारखान्यांनी 63.93 लाख टन उत्पादन केले होते. कर्नाटकात 63 साखर कारखान्यांनी 63.80 लाख टन उत्पादन घेतले; तर गतवर्षी 66 कारखान्यांनी 38.74 लाख टन उत्पादन घेतले होते. 

तामिळनाडूमध्ये 21 कारखान्यांनी 2.60 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. गेल्या हंगामात 32 कारखान्यांनी 3.85 लाख टन उत्पादन घेतले होते. गुजरातमध्ये 15 साखर कारखाने सुरू असून, त्यांनी 5.95 लाख टन उत्पादन घेतले आहे. गतवर्षी 16 कारखान्यांनी 7.78 लाख टन साखर उत्पादित केली होती. 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये 18 कारखानदारांनी तीन लाख टन साखर उत्पादन केली आहे. मागील हंगामात 25 कारखान्यांनी साडेचार लाख टन उत्पादन केली होती. बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साखरेचे उत्पादन अनुक्रमे 5.08 लाख टन, 2.41 लाख टन, 3.72 लाख टन, 3.51 लाख टन आणि 2.76 लाख टन इतके आहे. देशात सध्या साखर कारखान्यांमधील दर प्रतिक्‍विंटल 3100 ते 3300 रुपये असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) वतीने देण्यात आली. 

केंद्र सरकारने गतवर्षी 50 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 38 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. यंदा देशात 60 लाख टन साखरेची निर्यात करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी 16 लाख टन साखर निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर पाहता 50 लाख टनांपर्यंत निर्यात होणे अपेक्षित आहे. 
- संजय बॅनर्जी, प्रवक्‍ता, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, दिल्ली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरच्या पोलिस पथकावर पाथर्डीत गोळीबार! जेऊर येथील सराफा व्यापाऱ्यावरील दरोडा प्रकरण; साथीदारांसह आरोपी फरार, अक्कलकोट तालुक्यातील एकजण अटकेत

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ जून २०२६ ते १२ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

साधी कॉफी विसरा! केळं घालून बनवा व्हायरल Banana Coffee; शेफ कुणाल कपूरची खास रेसिपी

आजचे राशिभविष्य - 06 जून 2026

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT