Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास नकार, परवानगी न घेताच सभास्थळ केलं जाहीर

संतोष कानडे

मुंबईः राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होत आहे. परंतु या सभेसाठी जे मैदान निश्चित करण्यात आलेलं होतं, ते देण्यास संबंधित संस्थेने नकार दिलाय. त्यामुळे मनसेच्या अडचणींमध्ये वाढ होतांना दिसून येतेय.

येत्या ६ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होणार आहे. रत्नागिरीतल्या एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर मनसेची सभा होणार होती.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या सभेसाठी मनसेकडून सभास्थळाचे नावही जाहीर करण्यात आलेले होते. मात्र आज मनसेचे पदाधिकारी संस्थेकडे मैदानासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना नकार देण्यात आला.

या संस्थेने मागील १० वर्षांपासून कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान दिलेले नाही. त्यामुळे आम्ही मैदान देणार नाही, असं संस्थेच्या वतीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आले.

रत्नागिरीतल्या इतर मैदानांवर राजकीय पक्षांच्या सभा होतात. मात्र मनसेने जवाहन मैदानावर सभा घेण्याचं निश्चित केलं होतं. परंतु संस्थेने मनसेला नकार कळवला आहे.

संस्थेच्या या निर्णयामुळे कमी दिवसांमध्ये मनसेला नवीन मैदान शोधून तिथे सभेची तयारी करावी लागणार आहे. राज ठाकरे हे ६ तारखेला रत्नागिरी येथे बोलणार आहेत. या सभेकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्याची सुट्टी! कर्णधारपद अन् संघातली जागाही जाणार, टी२०चा 'नवा बॉस' कोण?

OBC कार्ड खेळत काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! बी. के. हरिप्रसाद बनले कर्नाटक काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष; डी. के. शिवकुमारांची जागा घेणार, सतीश जारकीहोळींचा पत्ता कट!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी वाचा एका क्लिकवर!

T20 Mumbai Women's league मध्ये फाल्कन्सच्या विजयात भारतीय स्टार सायली सातघरे अन् १४ वर्षीय स्वरा जाधव चमकली

Burning ST Bus : चांदवडजवळ ‘बर्निंग बस’चा थरार! चालक-वाहकांच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT