महाराष्ट्र बातम्या

राज्य मागासवर्ग आयोगातील दुसऱ्या सदस्याचा राजीनामा; लक्ष्मण हाकेंचा तडकाफडकी निर्णय

राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दुसऱ्या सदस्याने सुद्धा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दुसऱ्या सदस्याने सुद्धा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला हाके हे उपस्थित होते. मात्र हाके यांनी आयोगाला सदस्यतेचा राजीनामा देत असल्याचं कळवलं आहे. यापूर्वी आयोगाच्या बी एस किल्लारीकर यांनी सुद्धा राजीनामा दिला होता.

सर्व समाजाच्या मागासलेपणाचे सर्व्हेक्षण करावे अशी मागणी किल्लारीकर यांनी केली होती. पण, याबाबत एकवाक्यता न झाल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता हाके यांनी सुद्धा राजीनामा दिला आहे. मागासवर्ग आयोगातील इतर काही सदस्यांमध्ये देखील अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येते.

सध्या राज्याची सामाजिक परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे एका समाजाचे सर्व्हेक्षण करण्यापेक्षा सर्व समाजाचे सर्व्हेक्षण करावे. जाती आधारित सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करणे चांगले ठरेल. यामुळे प्रत्येक समाजाची खरी स्थिती समोर येईल. त्यामुळे शास्ज्ञोक्त माहिती जमा होईल, अशी माझी मागणी होती. पण, सदस्यांमध्ये एकवाक्यता झाली नाही, असं किल्लारीकर म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT