Rickshaw Driver sakal
महाराष्ट्र बातम्या

रिक्षाचालकांनो, 31 जुलैपासून ड्रेसकोड बंधनकारक, नाहीतर 500 ते 1500 रूपयांचा दंड; शहर वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिले गणवेशासाठी ‘हे’ तीन पर्याय

खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना 3 गणवेशाचे पर्याय दिले असून, 31 जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत. अन्यथा, त्यांना 500 ते 1500 रुपयांचा दंड केला जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांना आता गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक असणार आहे. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी त्यांना तीन गणवेशाचे पर्याय दिले असून, ३१ जुलैपर्यंत त्यांनी गणवेश शिलाई करून घ्यायचे आहेत. अन्यथा, त्यांना ५०० ते १५०० रुपयांचा दंड केला जाणार आहे.

महापालिकेचा परिवहन उपक्रम डबघाईला आल्यानंतर शहरात प्रवासी रिक्षांची संख्या प्रचंड वाढली आहे. रिक्षांच्या परमीटवर कोणाचेही निर्बंध नसल्याने दरमहा १०० ते १५० रिक्षा वाढत आहेत. सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडील नोंदीनुसार सोलापूर शहरात सद्य:स्थितीस १२ हजार ६३० ॲटोरिक्षा आहेत. त्यांच्यासाठी मीटर बंधनकारक असून, आठ वर्षांपर्यंतच्या रिक्षांना दोन वर्षाला फिटनेस करून घ्यावा लागतो तर त्यानंतरच्या रिक्षांसाठी दरवर्षी फिटनेस पडताळणी बंधनकारक आहे. मात्र, अनेक जुनाट रिक्षा रस्त्यांवर पाहायला मिळतात. फिटनेस नसलेल्या रिक्षांना चार हजार रुपयांचा दंड आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व स्वयंशिस्तीसाठी रिक्षा चालकास गणवेश बंधनकारक आहे. आरटीओ कार्यालयाने रिक्षा चालकांना ‘खाकी’चा पर्याय दिला आहे, पण वाहतूक पोलिसांनी तीन गणवेशांपैकी एकाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. आता ३१ जुलैपर्यंत किती रिक्षाचालक पोलिसांचे आदेश पाळतात, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

असे आहेत गणवेशाचे तीन पर्याय

  • १) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट

  • २) खाकी पॅन्ट, खाकी पॅन्ट

  • ३) खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट

...तर सतत भरावा लागेल १५०० रुपयांचा दंड

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी गणवेशाचे बंधन आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवरून दररोज १५ हजारांहून अधिक ॲटोरिक्षा धावतात, पण त्यातील ६० ते ७० टक्के चालक गणवेशाविनाच असतात. अशा रिक्षा चालकांसाठी शहर वाहतूक पोलिसांनी ३१ जुलैपर्यंत डेडलाईन दिली आहे. त्यानंतर पहिल्यांदा कारवाई करताना संबंधित रिक्षाचालकास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल. एकदा दंड होऊनही त्याने ड्रेसकोडचे पालन न केल्यास पुन्हा प्रत्येक वेळी दीड हजार रुपयांचा दंड होणार आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांना गणवेश शिलाई करून घ्यावाच लागणार आहे.

यासंबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत

अनफिट ॲटोरिक्षा चालकांनी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र काढून घ्यावे, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, गणवेश (ड्रेसकोड) वापरावा, यासंबंधीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. ३१ जुलैपर्यंत सर्वांनीच गणवेशाचा वापर करणे अपेक्षित असून त्यानंतर संबंधित ॲटोरिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT