महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: भाजपकडून खोट्या गोष्टींची पेरणी ! रोहित पवारांची खोचक टीका, शरद पवारांच्या जातीच्या दाखल्याबद्दलही उल्लेख

भाजपकडून समाजामध्ये खोट्या गोष्टी पसरविण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar Alleged BJP: भाजपकडून समाजामध्ये खोट्या गोष्टी पसरविण्याचे काम करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. शरद पवार यांचा समाजमाध्यमांमध्ये फिरत असलेला जातीचा दाखला खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टीने नियोजन व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसमवेत दिवाळी साजरी करण्यासाठी ते सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (ता. १२) उशिरा रात्री त्यांचे अमरावतीत आगमन झाले. आज सकाळी यवतमाळकडे जाण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजप समाजामध्ये दुही निर्माण करण्याचे काम करीत आहे.

खोट्या गोष्टी पसरवून त्याचे भांडवल करण्याचा उपद्रव सध्या त्यांच्याकडून सुरू आहे. यासाठी भाजपकडून एक स्वतंत्र विभागच तयार केला आहे. त्यांना भरीव निधी दिला जातो. भाजपला सत्य नको असून गैरमार्गाने सत्ता मिळवण्याचाच त्यांचा खटाटोप असतो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांना भरकटविण्याचा डाव आहे. ही सर्व रणनीती भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आमदार रोहित पवार म्हणाले की, " सध्या समाजमाध्यमातून व्हायरल होत असलेला शरद पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला खोटा आहे, आमचे नेते यासंदर्भात योग्य स्पष्टीकरण माध्यमांकडे सादर करणार आहेत." (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT