Rohit Pawar Pilgrim Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंआधीच रोहित पवार अयोध्येत; रामलल्लाचं दर्शन घेणार?

रोहित पवारांनी काल राजस्थानमधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली आणि त्यानंतर ते उत्तरप्रदेशकडे रवाना झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नेत्यांचे अयोध्या दौरे हा विषय सध्या राज्यातल्या चर्चेच्या प्रमुख विषयांपैकी एक आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा, धामधूम सध्या सुरू आहे. ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र आता चर्चा होतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याची. राज ठाकरेंआधीच रोहित पवार अयोध्येत जात आहेत.

रोहित पवार सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले आहेत. या यात्रेदरम्यान काल त्यांनी राजस्थानमधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. या मंदिराचं, भारतीय इतिहासाचं कौतुक पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलं आहे. त्यानंतर पुष्करचं ब्रह्म मंदिर, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर इथला दर्गा इथंही रोहित पवारांनी भेट दिली. या ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.

चार दिवसाच्या या राजस्थान दौऱ्यानंतर आता रोहित पवार पुढे उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आपल्या परिवारासोबत या दौऱ्यादरम्यान पवार आज सकाळी ११ वाजता अयोध्येत जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा इशारा अन् बंडू जाधवांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आता कार्यक्रम रद्द करणं शक्य नाही”

Mumbai Metro: मेट्रोचा उन्नत मार्ग 'फनेल'च्या कचाट्यात, 'एमएमआरडीए'ला विमानतळ प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा

Teacher Success Story: पतीचे पाठबळ, जिद्द अन् मेहनत; सारिका एकळ यांची शिक्षकपदी दमदार भरारी, जिद्द अखेर फळाला..

Chhatrapati Sambhajinagar BPCL Gas Project: ‘बीपीसीएल’चा गॅस प्रकल्प!; शहरात दररोज २०० टन ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया जागानिश्चितीनंतर कामाला गती, कचरामुक्तीसाठी फायदा

Marathi News Live Updates : जरांगेंच्या आवाहनानंतर नांदेड विमानतळाबाहेर मराठा आंदोलक आक्रमक

SCROLL FOR NEXT