Rohit Pawar सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेवरुन रोहित पवारांनी Zomato ला सुनावले

डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवलाय. यासंबंधीत त्यांनी एक ट्वीट करत झोमॅटोला सुनावले.

सकाळ डिजिटल टीम

आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन स्नॅक्स किंवा जेवणाची ऑर्डर करतात आणि अगदी कमी वेळात डिलिव्हरी बॉय त्या ऑनलाइन फूडची डिलिव्हरी करायला येतो. पण या दरम्यान तो कोणत्या परिस्थितीत त्याची नोकरी करतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी कोण घेतं, याचा विचारही आपल्या मनात येत नाही. आता झोमॅटो या घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीने एप्रिलपासून दहा मिनिटांत डिलिव्हरीची सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे. यावर डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवलाय. यासंबंधीत त्यांनी एक ट्वीट करत झोमॅटोला सुनावले. (Rohit pawar's Tweet )

रोहित पवार ट्वीटद्वारे म्हणतात, “डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची zomatoची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.”

झोमॅटोने १० मिनिटांत फुड डिलिव्हर करण्याची घोषणा केली. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी सोमवारी ट्विट केले की, 'झोमॅटोवर १० मिनिटांत फुड डिलिव्हरी लवकरच येत आहे.

यावरुन रोहित पवार यांनी या ट्वीटमध्ये zomato ला टॅग केले आहे. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची सेवा म्हणजे या डिलिव्हरी बॉईजच्या जीवाशी खेळ आहे, अशा शब्दात त्यांनी zomatoला सुनावले. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेण्याची आणि त्यांना विमा कव्हर देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT