Rohit Pawar and Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : 'औरंगाबादच्या नामांतराचा विषय केवळ राजकारणासाठीच का?' मुख्यमंत्र्यांना विसर अन् पवार संतापले

संतोष कानडे

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख औरंगाबाद असा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार संतापले आहेत. आधी स्व. बाळासाहेब ठाकरेंचा विसर आणि लगेच छत्रपती संभाजी नगरचा विसर; असं म्हणून पवारांनी शिंदेंना टार्गेट केलं.

रोहित पवार यांचं ट्वीट जशास-तसं

मुख्यमंत्री महोदय आजच्या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या फोटोचा जसा आपल्या पक्षाला विसर पडला तसाच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याचाही विसर पडलेला दिसतोय... आणि विसर पडला नसेल तर नामांतराचा विषय तुम्ही केवळ राजकारणासाठी वापरता, असं समजायचं का? विरोधी पक्षाकडून अशी चूक झाली असती तर सरकारकडून त्याचं राजकारण झालं असतं. मला राजकारण करायची नाही, पण आपल्या कार्यालयाकडून झालेली चूक निदर्शनास आणून द्यायचीय.. ती आपण दुरुस्त कराल, ही अपेक्षा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेबपोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या कामकाजाच्या अनुषंगाने औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर करून वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने https://mahawaqf.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल विकसित केले आहे. आता ऑनलाईन नोंदणीची सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटमध्ये छत्रपती संभाजी नगरचा उल्लेख औरंगाबाद केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यावरुन रोहित पवारांनी नामांतराचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला आहे. शिवाय जाहिरातीलील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विसरलेल्या फोटोवरुनही टार्गेट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT