Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Rohit Pawar: अधिवेशन होऊ दे. फंड मिळू दे. त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांसोबत गेलेले नेते नाराज असून ते बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फुट. फुटीनंतर राष्ट्रवादीतील नेते आता एकमेकांवर मोठे आरोप करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल करत मोठा दावा केला आहे. त्यांच्या पक्षात अनेक गोष्टी नॅार्मल नाहीत. अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, अधिवेशन होऊ दे. फंड मिळू दे. त्यानंतर अनेक आमदार निर्णय घेतील, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांसोबत गेलेले नेते नाराज असून ते बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर त्यांच्यासोबत गेलेले अनेक जण नाराज असल्याच्या बातम्या देखील वारवारं समोर येतात.

तर अजित पवार गटामधून परत येणाऱ्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत रोहित पवार म्हणाले, खालच्या पातळीवर टीका केली नसेल आणि जे विरोधात फार बोलले नसतील त्यांच्याबाबत आम्ही विचार करु. तर कोणाला पक्षात घ्यायचं याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष कोण? हे आधी बघावं लागेल

अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत. ते आधी बघावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अजित दादांपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसतात. पक्षावर अजितदादांपेक्षा पटेल यांची पकड मजबूत आहे. असंही पुढे रोहित पवार म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT