Rohit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : नीरव मोदींना जागा घेण्यासाठी कोणी मदत केली, चौकशी करा; रोहित पवारांची मागणी

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. या एमआयडीसीसाठी ते आक्रमक असून एमआयडीसी जागेप्रश्नी नीरव मोदींचे नाव समोर आले आहे. त्यावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे.

रोहित पवार म्हणाले की, राम शिंदे यांनी जो आरोप केला, आणि ज्या जागेबद्दल बोलत आहेत ती जागा राम शिंदे आमदार असताना म्हणजेच २०११ ते २०१४ या कालावधीत घेतलेली आहे. या जमिनी घेत असताना नीरव मोदींना कोणी मदत केली, याची चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच ही जागा ईडीने ताब्यात घेतली आहे. मात्र एमआयडीसीच्या सर्व्हेमध्ये ती जागा नाही.

दरम्यान ईडीची कारणे न देता एमआयडीसीबाबत अधिसूचना काढण्यासाठी मी मंत्री महोदयांना विनंती करतोय. मंत्री महोदयांची दोन दिवसांपूर्वी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याला मंत्रीमहोदय आले नव्हते. आता विधानसभा अध्यक्षांनी बैठक बोलवली आहे. त्याचा मान मंत्री महोदयांनी ठेवावा, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT