Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: अजितदादा बोलले ते चूकच! जाहीर निषेध, अजित पवारांच्या पीएचडीच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्याबाबत आक्रम पवित्रा घेतला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवारासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी भाजप-शिवसेना(शिंदे गट) यांच्यासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पक्षात दोन गट पडले. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय लढाई सुरु झाल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार अजित पवारांबाबत आक्रमकपणे बोलताना दिसतात. अशातच अजित पवारांच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे, असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत अजित पवार काय म्हणाले?

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक वक्तव्य केलं आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

'युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? ही गरिबाची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या पीएचडी करणाऱ्या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील. सरकारची मदत घेत असतील. तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजित पवार जे बोलले त्याचा मी निषेध करतो', असं रोहित पवार म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT