RTE admission sakal
महाराष्ट्र बातम्या

‘आरटीई’ प्रवेश मे महिन्यात! आता शाळांची नोंदणी नंतर मॅपिंग, मग २५ टक्के जागा रिक्त ठेवल्या जाणार; सोलापूर जिल्ह्यातील १६३५ शाळांची नोंदणी राहिलेली

आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्यानंतर आता शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, खासगी शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 6383 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यात जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपालिका खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्यानंतर आता शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, खासगी शाळांची नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील तीन हजार ६८३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यात जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपालिकांसह खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दरवर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा रिक्त ठेवल्या जात होत्या. सोलापूर जिल्ह्यातील साधारणपणे साडेतीन हजार तर राज्यातील एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना आरटीईतून मोफत प्रवेश मिळत होता. पण, आता विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावरील कोणत्याही शाळेत त्याला प्रवेश दिला जाणार आहे. त्यांना आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खासगी इंग्रजी शाळेत प्रवेश घेता येणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय तथा खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा नाही पण इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, त्यांनाच त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळणार आहे. त्यादृष्टीने आता सर्वच शाळांची नोंदणी केली जात असून त्यानंतर अंतरानुसार मॅपिंग होईल. त्यानंतर प्रत्येक शाळांची पटसंख्या व त्यात आरटीईतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा निश्चित होतील. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरु होईल आणि त्यासाठी मे महिना उजाडेल अशी सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील तीन हजार ६८३ शाळांपैकी दोन हजार ४८ शाळांचा नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून अद्याप एक हजार ६३५ शाळांची नोंदणी झालेली नाही. आज (सोमवारी) ही प्रक्रिया युद्धपातळीवर केली जाणार आहे.

सर्व शाळांची नोंदणी आज पूर्ण होईल

आरटीईअंतर्गत आता सर्वच शाळांची नोंदणी केली जात असून त्यासाठी सोमवारपर्यंत (ता. १८) मुदत दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार ६८३ शाळांपैकी एक हजार चार शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित शाळांची नोंदणी आज (सोमवारी) अपेक्षित आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

मुख्याध्यापक पदोन्नती अन्‌ बदल्यानंतर नवीन शिक्षकांना समुपदेशनाद्वारे नेमणूक

जिल्हा परिषद शाळांमधील ज्येष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती आणि ज्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या बदल्या झाल्यानंतर नवीन शिक्षक भरतीतील २७३ शिक्षकांचे समुपदेशन होईल. आंतरजिल्हा बदलीतून तीन शिक्षक आले असून त्यांनाही नेमणूक दिली जाईल. आंतरजिल्हा बदलीतून ८२ शिक्षक येणार आहेत, ते अजून आलेले नसल्याने त्यांना शाळा सुरु झाल्यावरच नेमणुका मिळतील. दरम्यान, या प्रक्रियेमुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रखडले असून त्यांना आता २०२३-२४ च्या संचमान्यतेची वाट पाहावी लागणार आहे अशी सद्य:स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar Net Worth : डी. के. शिवकुमार देशातील 'सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री! 5 वर्षांत संपत्तीत 500 कोटींची वाढ, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

West Bengal Political Crisis : ममतांना मोठा धक्का, 60 बंडखोरांनी मांडली वेगळी चूल; गटनेते पदी ऋतब्रत यांची निवड, पक्ष चिन्हावरही केला दावा

दक्षिण मुंबईत वीज संकट! BEST अ‍ॅक्शन मोडमध्ये; 690 कर्मचाऱ्यांची भरती होणार, वारंवार बत्तीगुल होत असल्याने मोठा निर्णय

इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

Latest Marathi News Live Update : टोमॅटो कॅरेटच्या वादातून फेरीवाल्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT