rajya sabha election result sanjay raut  sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

'आमच्या हातात २ दिवस ईडी द्या, फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील'

पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचं भाजपचा डाव आहे असं राऊत म्हणाले आहेत.

दत्ता लवांडे

मुंबई : "ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात बैठक बोलावली आहे. त्याचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांना आलं असून ही बैठक १५ जूनला पार पडणार आहे. आमच्यातील एखादा प्रतिनिधी या बैठकीला हजर असेल" असं राऊत म्हणाले. दरम्यान या बैठकीला मुख्यमंत्री हजर राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

(Sanjay Raut On Devendra Fadnavis)

"या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबरोबरंच, केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग कसा केला जातोय यावरही चर्चा होणार आहे." असं राऊत म्हणाले. राज्यसभेच्या निवडणुकांत शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाल्यावर राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे घेतले आहेत. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्या अपमान करण्याचा आमचा मानस नाही कारण आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील." अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान "भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना डावललं आहे. त्यांच्याबाबत चिंता करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती टिकवण्यासाठी मुंडे यांचा मोठा हात आहे." असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात काल सोनिया गांधी यांनीही शरद पवार यांच्यासहित विरोधी पक्षांनेत्यांशी संपर्क साधला आहे. त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून बैठकीसाठी निमंत्रण दिलं आहे. याचं निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आहे पण शिवसेनेकडून एक प्रतिनिधी या बैठकीला असणार आहे असं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Nainital Travel: ऑफ सीजन बनला सुपरहिट! पावसाळ्यात नैनीतालमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी, स्थानिकांची कोट्यवधींची उलाढाल

Team India Selection:भारतीय संघात श्रेयवादासाठी चढाओढ! गौतम गंभीर, अजित आगरकर यांच्यावरही 'ती' दोघं ठरतायेत वरचढ; Inside News

SCROLL FOR NEXT