Sadabhau Khot criticized Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ''तुम्हाला काय करायचं ते करा...'' सैतान प्रकरणावरुन सदाभाऊ खोत आक्रमक

संतोष कानडे

मुंबईः शरद पवारांना सैतान असं म्हटल्यानंतर राज्यभरात सदाभाऊ खोतांविरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यावर सदाभाऊ आक्रमक झाले असून तुम्हांला काय करायचं ते करा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

रयत क्रांती सेनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे शरद पवार यांच्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरली होती. शरद पवारांवर त्यांनी जहरी टीका करत त्यांचा उल्लेख काल 'सैतान' असा केला होता. माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "महाराष्ट्रातील राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे चालल्याचं बघायला मिळतयं. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील या माणसांच मोठं योगदान आहे."

८०च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार साहेबांचा उदय झाला आणि तिथून पुढे राजकारणाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली आणि इतका ऱ्हास झाला की वाडे विरुद्ध गावगाडे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा नवा संघर्ष उभा राहिला. सरंजामशाहीचा कालखंड पवारांमुळे उभा राहिलेला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आणि हा अंमल जवळजवळ ५० वर्ष या राज्यामध्ये राहिला." हे सांगतांनात त्यांनी शरद पवारांंचा उल्लेख सैतान असा केला.

खोतांच्या या विधानानंतर राज्यभरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनावधानाने बोलून गेलो, अशी सारवासारव केली होती. मात्र तरीही वादंग पेटलेलंच होते. त्यामुळे शेवटी सदाभाऊ आक्रमक झाले.

खोत म्हणाले की, तुम्हांला काय करायचं ते करा. आमचं काय वाईट करणार तुम्ही? राजकारणातून उठवणार का? नंगे को खुदा भी डरता है.. हम भी नंगे हैं.. और तुम कितने नंगे हो हम भी दिखा देंगे. आमच्याकडेही मोठ्या पोथ्या आहेत.. असं म्हणून एक प्रकारे त्यांनी इशाराच दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT