sadabhau khot esakal
महाराष्ट्र बातम्या

'पवारांना युक्रेनची चिंता; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काय?'

एसटी कामगारांचा संप मोडायचा, ही सरकारची भावना-सदाभाऊ खोत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) साहेब यांना युक्रेनमधील (Ukraine) विद्यार्थ्याची चिंता लागली. महाराष्ट्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचत नाहीत, त्याची ससेहोलपट होत आहे. त्यांची पवार साहेबांना चिंता का लागली नाही? तिकडे विमानं सोडण्याची मागणी करता पण मग इकडंच्या एसटीचं काय? इकडे एसट्या सोडा ना अशी टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला.

एसटी कर्मचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम राज्य शासन करत आहे. एसटी संदर्भातील त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कामगार विरोधी आहे. त्याची आज विधानभवनाच्या समोर सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी कागदपत्रांची होळी करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. यावेळी त्यांनी सरकारला इशाराही दिला.

एसटी कर्मचाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम राज्य शासन करत आहे.

सरकारवर निशाणा साधताना सदाभाऊ म्हणाले, एसटी कामगारांचा संप मोडायचा, ही सरकारची भावना आहे. कामगारांना देशोधडीला लावायचं, हाच सरकारचा मानस आहे. फक्त इतकंच नाही तर एसटीच्या खाजगीकरणाचा घाट या सरकारने घातलाय, त्यांना एसटीचं खाजगीकरण करुन हफ्ते वसूली करायचे आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ म्हणाले, एसटीत काम करणारी माणसं आमची शेता बांधावरची माणसं आहेत, खेड्यापाड्यावरची माणसं आहेत, यांची माती आम्ही होऊन देणार नाही. आता जर तुम्ही एसटी कामगारांना बांबू लावणार असाल, तर आम्ही तुम्हाला बांबू लावू असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT