Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'शिवबांचे गुरू समर्थ नाहीत, तर..',राज्यपालांच्या विधानानंतर शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

ओमकार वाबळे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतात. यंदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा नव्या काँट्रोव्हर्सीला जन्म मिळाला आहे. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात केलं. (Bhagatsingh Koshyari Speaks on Shivaji Maharaj)

या विधानानंतर त्यांच्यावर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शरद पवार यांचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे चर्चांना आणखी उधाणं आलंय. (Sharad Pawar)

यानंतर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर करत छत्रपतींचे खरे गुरू कोण, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी हा व्हिडीओ शेअर करत राज्यपालांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच खासदार सुप्रिया सुळे यांनीही व्हिडीओ शेअर केला आहे.

जे लोक सांगतात रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते. ते खोटं आहे. शिवाजी महाराजांचे खरे गुरू जिजाऊ माता होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला, तर रामदास नव्हते, असं शरद पवारांनी म्हटलंय. ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी ही कमाल केली. त्यांनी इतिहासात रामदास गुरू असल्याचं लिहून ठेवलं, असं पवार एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT