sambhaji raje sakal
महाराष्ट्र बातम्या

शाहू छत्रपतींच्या विधानावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मी सत्यच बोललो पण....

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे, राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा निर्णय संभाजीराजेंनी जाहीर केला होता. त्यांचा निर्णय वयक्तिक होता असं संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे, यानंतर संभाजीराजेंची (Sambhaji Raje) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती म्हणाले होते की, राज्यसभेसाठी अपक्ष लढण्याचा संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय वैयक्तिक होता. याबाबत त्यांनी कुटुंबियांशी सल्लामसलत केली नव्हती, त्यामुळं शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारण हा छत्रपती घराण्याचा अपमान असं म्हणता येणार नाही. यावर संभाजी राजे यांची पहिली प्रतिक्रिया देत ट्वीट केलं आहे, त्यांनी लिहीलं की, "छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही"

संभाजीराजे यांनी आत्तापर्यंत जे राजकीय निर्णय घेतले ते वैयक्तिक पातळीवर घेतले आहेत. यासाठी त्यांनी कधीही आमच्याशी आणि कुटुंबियांशी चर्चा केली नाही. त्यामुळं त्याचे निर्णय हे छत्रपती घराण्याचे निर्णय होते असं म्हणता येणार नाही. त्यामुळं शिवसेनेनं त्यांना उमेदवारी नाकारली हा छत्रपती घराण्याचा अपमान आहे असं म्हणता येणार नाही, अस स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे, असे शाहु महाराज म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्याचा कोल्हापुरात उन्माद २५ हून अधिक वाहने फोडली; तलवारी, एडके घेऊन केली दहशत

CM Gram Sadak Yojana: मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ग्रामीण रस्त्यांसाठी ६,४२९ कोटींचा निधी; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Monsoon Update : मान्सून पुन्हा लांबणीवर...महाराष्ट्रात नेमका कधी दाखल होणार? मॉन्सूनची प्रगती का रखडली? जाणून घ्या

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

SCROLL FOR NEXT