Sangli Lok Sabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Sangli Lok Sabha 2024: "सांगलीच्या जागेबाबात फेरविचार करावा, येणाऱ्या काही दिवसात..."; विश्वजीत कदमांनी स्पष्ट सांगितलं

Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभा जागेबाबत अजूनही महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

Sandip Kapde

Sangli Lok Sabha 2024: सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यावर काँग्रेसनेते नाराज आहेत. त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीतील पलूसमध्ये पत्रकार परिषद घेतली.

विश्वजीत कदम म्हणाले, जागावाटपावर तीन महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून आम्ही आग्रही होतो. स्थानिक ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. अनेक ग्रामपंचायती काँग्रेसला मानणाऱ्या आहेत. ही काँग्रेस पक्षाची मजबूत बाजू आम्ही दाखवली.

कोल्हापरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढायची होती. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला. सांगलीतील चंद्रहार पाटील यांची उमेदवारी देखील दाखल करण्यात आली. आमच्या राज्यातील नेत्यांनी हा एकतर्फी निर्यण असल्याचे देखील म्हटले आहे, असं विश्वजीत कदम यांनी सांगितले.

आम्हाला उद्धव ठाकरे यांचा आदर आहे. पण सांगलीचा राजकीय इतिहास आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षात घेतले असते तर  वेगळी परिस्थिती निर्माण झाली नसती. आम्ही सातत्याने काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडली. आज जिल्ह्यातील कार्यकर्ता आणि आमदार म्हणून माझी विनंती आहे. महाविकास आघाडीने सांगली जिल्ह्यातील खरी राजकीय परिस्थिती समजून घ्यावी आणि फेरविचार करावा, असा सल्ला विश्वजीत कदम यांनी सांगितले.  

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जी लढाई सुरु आहे त्या लढाईत आम्ही महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत. मात्र काँग्रेसपक्षाच्या या जागेबाबात येणाऱ्या काही दिवसात निर्णय घ्यावा. आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत. यातून सकारात्मक मार्ग काढू, असे विश्वजीत कदम म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT